लेखांक २४४
श्रीमार्तंडप्रसन
तीर्थरूप राजश्री बावा गोसावी वस्ती का। नीब वडीलाचे सेवेसी
अपत्ये खेलोजी गावडे देसाई ता। सातारा पायावरी डोई ठेऊन दंडवत विनंति उपेरी आमचे विसि सांगोन पाठविले तरी स्वामीनी हर एकविसी आमचे धोका न धरिजे आह्मापासून सहसा चाकरीस अंतर पडणार नाही परत फौज ये प्राती आहे तो तुह्मी गावावरी न राहाणे गुरे थाटे न ठेवणे खाबरदार राहाणे विशेश लेहू तरी स्वामी वडील आहेत हे विनंति
मोर्तब
सूद