लेखांक २४३
श्री
राजश्री आनंदगीर गोसावियाचे सेवेसी
.॥ उतमगुणपरिपूर्ण धर्मपरायण प्रति विठल यबाजी कुलकर्णी वा माहारोजी फालका वा गुराई वा कनकोजी साहता मौजे गोवे नारायण विनंति उपरी आह्मी साळवणात कीर्दी केली आहे त्यावरते देवाचे बागाचे धरण आहे ते नस्टाईने कोणीतरी धरण फोडून पाणी नास करितात त्यावरून तुह्मी आह्मास कीर्दीकरास जाणून बुधीसी लाविता तरी अजी पासून जोवरी आमचे कीर्दी आहे तोवरी चैत्र वैशाख जेस्टा पावेतो धरण जतन करून
विठल यवाजी कनकोजी साहता
१ ब्रहस्पतवार १ सनवार
१ सुक्रवार १ आदितवार
------- -------
२ २
माहारोजी गुसाईजी
१ सोमवार १ बुधवार
१ मंगलवार
-----
२
येणेप्रमाणे धरण जतन करून ज्याचे दिवसात फुटेल त्याने गोसावियाचे राहा करून गुन्हेगारी द्यावी हे पत्र सही