लेखांक २४२
श्री
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री माणको गोविंद गोसावी यासि ता। रा। आणाजी जनार्दन सुभेदार प्रा वाई गोसावी यासि
सेवक परशराम त्र्यंबक नमस्कार उपर मौजे इडमिडे सुभा वाई हा गाव रा। सदानंद गोसावी यास इनाम आहे त्यास पेशजी वैराटगड घेतला ते समई मौजे मा।रीहून रुपये दोनीसे घेतले व त्याउपरी सिलेमानखानास भेटावयास गेला ह्मणून निमीत्य ठेऊन दोनीसे रुपये घेतले पुढेही साप्रत उपद्रव देता ह्मणून कळो आले तरी ऐसी गोष्टी न करणे गाव गोसावी यास इनाम आहे त्यास सर्वथीव उपद्रव न देणें येविशीचा बोभाट येऊ न देणे जाणिजे छ २७ मोहरम निदेश समक्ष
राजते
लेखना
वधी
सुरुसुद