लेखांक २३८
राजश्री आनंदगीर गोसावी मठ सदानंद गोसावी यासि
.ll अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य सेवक महिमाजी पा। व तानाजी पा। व विठोजी पा। व परसोजी पा। व कृस्णाजी कोनोजी व विसजी पा। व बाजे बापभाऊ समस्त मोकदम मौजे गोवे सा। नीब पा। वाई दंडवत विनंति उपरी आपले आत्मसंतोसे दसनामाचे भंडारियाबदल जमीन
१॥ दीड नजीक नदी बागाचे खाली टुकडा दीधला असे लेकराचे लेकरी चालऊन जो हिक हरकत करील त्यास श्री व आपले वडिलाचे इनाम असे हे लिहिले सही व आमचे पाटाचे पाणीयासी निसबत नाही तुह्मी आपले धरणी पाणी धरणे कलले पाहिजे हे विनंती
(निशाणी नांगर)