लेखांक २३७
श्री
श्री सकलतीर्थामाजी कासी वर्तामाजी एकादसी देवामासी रुसीकेसी पुस्पामाजी श्रीतुलसी तैसेच आणंदगिरी गोसावी बाबा स्वामि आह्मासी स्वामिचे सेवेसी बालके राहुजी पाटील वाघोजी पाटील व कमलोजी पाटील व समस्त दाहीजन मौजे खेड बु॥ पा। सिरवल दोन्ही कर जोडून सिरसा दडवत विनंति उपेरी कृपा करून पत्र पाठविले ते सिरी वदिले ते पत्रीची आज्ञा की धर्मादाउ इनाम बिघे ५ आहेत ते कीर्दी करणे ह्मणौन आज्ञा तरी गावी नवी लावणी होती येथे स्वामीच्या सेतास सरीक पाहातो सरीक मिळलावरी लावणी करून याखेरीज स्वामिने ते प्रांतीहून एक कुनबी पाठवावा आपले भुगतीचे सेती कीर्दी करवणे ह्मणजे आह्मी मोक्षास लागोन बहुत ल्याहावे तरी स्वामि सर्वज्ञ आहेत बालकावरी अखडित कृपादृष्टी करीत जाणे मी सेवक असे हे विनंति