लेखांक २३६
तीर्थस्वरूप माहाराज राजश्री भवानगीर
बाबा माहाराज स्वामी गो।
अखंडितलक्षुमी सदाप्रसन सेवेसी मोकदम मौजे आणदुरी दोन्ही कर सोडून नमो नारायण विनंती उपरि येथील क्षेम जाणून आपले क्षेम लिहीत आज्ञा केली पाहिजे विशेश दया करून कृस्णगीर पाठविले त्यास येथे इनाम बदल जाणउनु लिहिले तरी पूर्वापार तुमचा इनाम आहे व तुमचे वडिली चालत आहे त्यासि येथे ठीकी गुंतली आहे ती रिकामी जाहलीवरी तुमच्या अतीताचे हवाले करून काही सधेव नाही तूर्त करणगिरीचे हवाला दाणे मण .l. पाच मण करितो कलेले पाहिजे येथे मठ घातलियावरी अवघा धंदा चालिला आहे इनाम हि लागत इनाम हि लावितो कलल पाहिजे माहाराजे दया करून पत्र पावीत गेले पाहिजे वडीलाचे चालविले तैसे च दया करीत जाणे बहुत काय लिहीन कृपा निरंतर असो देणे हे विनंति