लेखांक २३०
श्री १६९५ मार्गशीर्ष वद्य ९
तालिक
राजश्री हवालदार व कारकून किले वदनगड गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। सखाराम भगवत आशिर्वाद व नमस्कार सु॥ अर्बा सबैन मया व अलफ सयापर्वत गोसावी मठ मौजे देगाव याणे येऊन विदित केले की आपल्या गुरूस मौजे भोईज येथील पाटलानी जमीन बिघे
१० दहा बिघे कृष्णार्पण करून दिल्ही त्याजपासोन सात डोया आपले गुरूची परपरात जमीन अनभवीत आलो आहो साप्रत सालमा। भवानजी आपाजी भोसले पा। तिसरी तक्षीम मौजे मा। याणी जमीन अडथळा केला आहे तीनशे रुपये यमागतात येविषई मनास आणून सुदामत चालतेयाची चवकसी मनास आणून जमीन चालत आली आहे त्याप्रो। चालवावे ह्मणून विदित केले त्याजवरून पत्र लि॥ आहे तरी तिन्ही तक्षिमाचे पाटील व कुलकर्णी आणून चौकसी करून गोसावी याणे सागितल्याप्रो। सात डोया जमीन याजकडे चालत आली आहे ऐसे असल्यास भवानजी आपाजीस ताकीद करून जमीन गोसावी यासी देणे ऐवजाचा तगादा न करणे याप्रो। विल्हेस लावणे गोसावी याचा बोभाट होऊ न देणे जाणिजे छ २३ रमजान बहुत काय लिहिणे