लेखांक २२९
श्री १६९२ भाद्रपद वद्य ७
तालिक
राजाश्रिया विराजित राजमान्य राजश्री माणको
भानजी स्वामी गोसावी यासि
सेवक कृष्णराव बल्लाळ नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणे यानतर श्री सदानंद वास्तव का। निंब प्रा। वाई यास मौजे अदोरी प्रा। शिरवळ येथे राजपत्री इनाम जमीन बिघे ३० एकूण चावर पाव चावर .।. गावपैकी चालत आहे त्यास गावकरी इनाम तिजाईचा तगादा करून सन सबैनात माल अटकाविला आहे ह्मणोन विदित जाले त्याजवरून हे पत्र तुह्मास लिहिले आहे तरी धर्माची जमीन पूर्वापासून चालत आहे त्यास इनाम तिजाईचा तगादा गावकरी करितात त्यास ताकीद करणे की धर्माची जमीन आहे इनाम तिजाईचा तगादा न करणे माल अटकाविला असेल तो ताकीद करून देववणे आजपावेतो घेत नसेल इनाम तिजाई तरी नवीन न घेणे ह्मणोन ताकीद करणे जाणिजे छ २१ जमादिलावल सु॥ इहिदे सबैन हे विनंती