लेखांक २२८
श्री १६७५ आश्विन शुध्द ३
अज दिवाण किले वंदनगड ता। मोकदमानी मौजे गोवे सा। निंब प्रात वाई सु॥ अर्बा खमसैन मया अलफ मौजे मजकुरी किला नि॥ जमीनपैकी तपोनिधी राजश्री भवानगिरी बावा महत वास्तव्य का। निंब याकडे जमीन 6 ५ पाच बिघे ठेविले आहेत यास गड नि॥ जमिनीची पाहणी जाहली ते समई याकडे पाच बिघे ५ चालिले अस्ता गोसावी यास ऐवज पावत नाही ह्मणून कळो आले तरी सदरहू पाचा बिघ्याचा दळा दुमाला करणे तेथील जो ऐवज येईल तो घेतील याउपरी फिरोन बोभाट येऊ न देणे जाणिजे रा। छ १ जिल्हेज मोर्तब