लेखांक २२७
श्री १६७४ वैशाख शुध्द ९
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब याणी ता। मोकदमानी मोजे इरमाडे प्रा। कराड यासि आज्ञा केली ऐसी जे सु॥ इसने खमसैन मया व अलफ मौजे मजकुरी कृष्णगिरी महत याची जमीन । तीस बिघे इनाम सदानद गोसावी याचा आहे त्यास मौजे मा।री इनामघरवटा करितील अगर वाटेकरी यास कळेल तैसा लावितील तुह्मी गावकरी इनामासी हिक हरकत न करणे फिरोन बोभाट हुजूर आलीया कार्यास येणार नाही ऐसे पष्ट समजणे जाणिजे छ ७ माहे जमादिलाखर सु॥ इसने खमसैन मया व अलफ
मोर्तब
बार