लेखांक २२६
श्री १६७३ आश्विन वद्य ११
सदानंद
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब याणी मोकदमानी मौजे गोवे प्रा। वाई सुहूरसन इसन्ने खमसैन मया व अलफ कृष्णगीर गोसावी मठ मौजे निंब याचे इनाम मौजे मजकुरी आहे त्यात बोरी व बाभळ वगैरे झाडे आहेत त्यापैकी झाडे वठली आहेत तो विकत आहे त्यास तुह्मी अडथळा न करणे वगैरे झाडास काडीमात्र अडथळा न करणे जाणिजे छ २४ जिलकाद लेखनावधी