लेखांक २२१
श्री १६५३ मार्गशीर्ष शुध्द ९
श्रीसदानंद
सो। मोकदमानी देहाय सा। हवेली यासि हरी मोरेश्वर अजहत देशमुख व भगवत सामराज व गिरमाजी झुगो देशपाडे पा। वाई सु। इसन्ने सलासीन मया व अलफ तपोनिधी भवानगीर गोसावी महत वास्तव्य मठ श्री स्वामी का। निंब येथील मठचे भडारा व दिवाबत्तीस पुरातन गावगना टका एक व गला कुडो एक देविला आहे तरी ता।साल गु॥ चालत आले असेल त्याप्रा। देणे हाली कितेक गाव उजूर करिताती ह्मणून मठचे गोसावीयानि जाहीर केले त्यावरून ताकीद एकदर लि॥ असे तरी सालाबादप्रा। मठचे गोसावी येतील त्यास गावटका व गाव कुडो देत जाणे याखो। जे जावी साळी कोष्टी धणगर असतील तेथे काबळा व पासोडी सालाबादप्रा देणे अचला व कोपीनेचे बेगमीस पुरातन देत आला आहा त्याप्रा। देणे धर्मकृत्य आहे श्री देवस्थान अनादसिध आहे तेथील जे चालत आहे त्याप्रो। देत जा उजूर न करणे छ माहे जमादिलाखर मोर्तब