लेखांक २१८
श्री १६४६ कार्तिक वद्य १२
सो। मोकदमानी मौजे देहाय सा। निंब पा। वाई यास माहादाजी गणेश आ। देशमुख पा। वाई सुहूरसन खमस अशरीन मया अलफ तपोनिधी भवानगिरी गोसावी महत यानी विदित केले की प्रातमजकुरी श्री मठ का। निंब याची झोळीभिक्षा दूर गावास साला बाद चालत आहे त्याप्रो। सुरळीत देणे ह्मणून गावगन्ना ताकीद दिल्ही पाहिजे ह्मणून विदित केले तर दर गावास सालाबाद झोळीभिक्षा जे देत असाल त्याप्रो। देणे कोणी खलेल न करणे जाणिजे छ २५ सफर