लेखांक २१७
श्री १६४२ कार्तिक शुध्द १०
तालिक
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४७ शार्वरीनाम सवत्सरे कार्तिक शुध दशमी मतवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व कारकून पा। मावळ यासी आज्ञा केली (शिक्का) (शिक्का) ऐसी जे श्री सदानद बावा वास्तव्य का। निंब प्रा। वाई यासी ता। शिरवळ पा। मा।र पैकी इनाम जमीन आहे बिघे बितपसील
मौजे आणदुरी .।. मौजे खेड १०
एकूण चाळीस बघे पेशजीपासून इनाम चालत असता सालमारी खलेल जाले आहे इनाम मठाकडे सुरळीत चालत नाही ह्मणोन हुजूर विदित जाले त्यावरून आज्ञापत्र सादर केले आहे तरी तुह्मी गावकरास ताकीद करून पेशजीप्रा। इनाम जमीन मठाकडे सुरळीत चालवणे लेखन अलंकार मोर्तब
रुजु सुरुनिवीस बार सुरुसुद सा। मत्री बार बार