लेखांक २१६
श्री १६४२ आषाढ शुध्द ५
सदानंद (शिक्का)
अज दिवाण महाल खालसा प्रा। वाई ता। मोकदम मोजे इडमिडे सा। हवेली सु॥ इहिदे अशरीन मया अलफ रा। भवानगीर बावा महत यानी विदित केले की मौजे मजकुरी श्री स्वामीचा इनाम तीस बिघे जमीन सालाबाज आहे त्यामध्ये थोडी बहुत कीर्दी जाली आहे वरकड पडिला आहे त्याचे ताकीदपत्र दिल्हे पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून सालाबाज प्रा। इनाम दुमाला केला असे गोसावी लावणी सचणी करितील कोणी कथला न करणे छ ३ माहे रमजान