लेखांक २१५
श्री १६४१ कर्तिक शुध्द १२
तपोनिध राजमान्य राजश्री भोवानगीर गोसावी प्रती महादाजी गणेश अजहत देशमुख पा। वाई नारायण सु॥ अशरन मया अलफ गोसावी यात व तुह्मात खटखट जाहली त्याचा बोभाट हुजूर आला त्यावरून रा। स्वामीनी मल्हारजी पाटील निंबकर यासी बोलाऊन जे सागितले आहे त्याप्रमाणे तुह्मी व गोसावी चालणे गावकरी व मानाजी पाटील व गगाजीपत ऐसे बेसौन जे सागितील त्याप्रो। तुह्मी वर्तणूम करणे जरी काही न माना ह्मणजे विचार बरा नाही ऐसे समजोन सागितील प्रमाणे समजोन राहणे बहुत काय लिहिणे रा। छ १० मोहरम हे विनंती (शिक्का)