लेखांक २१४
श्री १६३८ भाद्रपद शुध्द ३
सो। मोकदमानी मौजे सिधनाथवाडी सा। हवेली यासी माहादजी गणेश अजहत देशमुख व विसाजी नीलकठ वब गिरमाजी झुगो देशपाडे पा। वाई सु॥ ११२७ बायाबाई श्री चे समाधीची व श्रीसिधेश्वर देव मौजे मा।र येथे राहून सेवा श्रीची करून आहे योगक्षेम चालोन श्रीचे सेवा चालावीयाकरिता दोनी बिघे जमीन बा। सनद सुभा दिली आहे त्याप्रो। देणे दुतर्फा चालऊन छ १ रमजान