लेखांक २००
श्री १६२७ चैत्र वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३१ पार्थिवनाम संवत्सरे चैत्र बहुल दशमी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री मुद्राधारी किले चंदनगड यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे पा। वाई हा गाव राजश्री सदानंद गोसावी याच्या मठास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणून हुजूर विदित जाले तरी ऐसी बदराहा वर्तणूक करावया तुह्मास गरज काय हे रीत स्वामीस मानत नाही हे जाणून याउपरी मौजे मजकुरास येकजरा उपसर्ग न देणे रोखापोखा काही न करणे फिरोन हुजूर बोभाट येऊ न देणें जाणिजे लेखनालंकार
रुजु सुरुनिवीस
सुरुसुद बार