लेखांक १९६
श्री १६२५ मार्गशीर्ष वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २९ चित्रभानु संवत्सरे मार्गशीर्ष बहुल दशमी गुरुवासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री जगजीवन नारायण देशाधिकारी प्रांत वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे ता। हवेली वाई हा गाव सदानंद स्वामी गोसावी यास इनाम आहे ऐसे असता तुह्मी मन मानेसे रोखे करून गावास उपसर्ग देता मिरासपटीचा वसूल मागता ह्मणोन हुजूर विदित जाले तरी गोसावी यास मौजे मजकूर कुलबाब कुलकानू गाव इनाम दिल्हा असता तुह्मी नसते कथले करावे हे कोण गोष्ट आहे याउपरी तर्ही त्या गावास एकजरा उपसर्ग न देणे भवानगिरी गोसावी त्या गावीची लावणी सचणी करून वसूल घेतील तो घेऊ देणे तुह्मी उपसर्ग काही नेदणे तिजाईचे उपसर्ग नेदणे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार