लेखांक १९५
श्री १६२५ कार्तिक शुध्द ७
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे कार्तिक शुध सप्तमी गुरुवासर क्षत्रिय कुलवतंस श्री राजा शिव छत्रपती याणी मुकादम व चौघला व रयान मौजे इडमिडे समत निंब प्रांत वाई यासी आज्ञा केली ऐसी जे मौजेमजकूर सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे ऐसे असता तुह्मी वसुलास खलेल करिता ह्मणून हुजूर विदित जाले तरी ऐसी बदराहा वर्तणूक करावया तुह्मास गरज काय याउपरी तुह्मी हुशार होणे आणि मौजे मजकुराचा उसूल सुरळीत देत जाणे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार