लेखांक १९४
श्री १६२५ कार्तिक शुध्द ७
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे कार्तिक सुधसप्तमी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री सुभेदारानी व कारकुनानी सुभेलष्कर यासी आज्ञा केलीं ऐसी जे मौजे इडमिडे प्रात वाई हा गाव सदानंद गोसावी याचे मठास इनाम आहे तेथे तुह्मी स्वारीशिकारीमुळे येऊन गांवास उपसर्ग देता धामधुम करिता ह्मणून हुजूर विदित जाले तरी गोसावी याचे गावास उपसर्ग द्यावया तुह्मास गरज काय याउपरी जो कोण्ही उपसर्ग देईल त्याचा परिछिन मुलाहिजा होणार नाही निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार