लेखांक १९१
श्री १६२४ मार्गशीर्ष वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २९ चित्रभानू संवत्सरे मार्गशीर्ष बहुल दशमी गुरुवासर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री सुभेदारानी व कारकुनानी सुभे लष्कर यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे ता। हवेली वाई हा गाव सदानंद गोसावी यास पहिलेपासून इनाम आहे ऐसीयास तुह्मी येता जाता स्वारीशिकारीमुळे उपसर्ग देता ह्मणोन विदित जाले तरी याच्या गावास इनामतीस उपसर्ग द्यावयास गरज काय याउपरी जो कोण्ही उपसर्ग देईल त्याचा मुलाहिजा होणार नाही जाणिजे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार