लेखांक १९०
श्री १६२४ मार्गशीर्ष वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २९ चित्रभानु संवत्सरे मार्गशीर्ष बहुल दशमी गुरुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती याणी राजश्री रगोजी गुड व रा। संभाजी लगड यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे ता। हवेली घाई हा गाव सदानंद गोसावी यास इनाम आहे ऐसीयासि भवानगिरी गोसीवी तुह्मास लिहितील त्याप्रमाणे त्याची मदत करून गावीचा ऐवज सुरळीत त्यास पावे कोण्हाचा उपसर्ग न लागे ते गोष्ट करणे जाणिजे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार