लेखांक १८९
श्री १६२४ मार्गशीर्ष वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २९ चित्रभानु संवत्सरे मार्गशीर्ष बहुत दशमी गुरुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती याणी मुकादमानी व रयानी मौजे इडमिडे हवेली वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे मा।र सदानंद गोसावी यास इनाम आहे तेथील कमाविशीस भवानगिरी गोसावी यानी त्रिंबक जिवाजी यास ठेविले आहे ऐसे असता तुह्मी सुरळीत वसूल देत नाही ह्मणोन गोसावी यानी हुजूर लिहिले होते तरी ऐसी लबाडी करावया तुह्मास गरज काय याउपरी गावीचे खंडणीप्रमाणे कुलबाब कुलकानू सारा वसूल गोसावी याकडे देत जाणें उजूर व दिरंग केलीया मुलाहिजा होणार नाही ताकीद असे जाणिजे निदेश समक्ष
रुजु सुरनिवीस
सुरुसुद बार