लेखांक १८८
श्री १६२४ मार्गशीर्ष वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २९ चित्रभानु संवत्सरे मार्गसीर्ष बहुल दशमी गुरुवासर क्षत्रिय कुलवतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री तुकोजी भोसले मुद्राधारी किले पांडवगड यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे ता। हवेली वाई हा गाव सदानंद गोसावी यास इनाम आहे तेथे तुह्मी लोक पाठऊन मन मानेसी धामधुम करिता ह्मणोन हुजूर विदित जाले तरी गोसावी यास मौजे मा।र इनाम असता तुह्मास उपसर्ग द्यावया गरज काय आहे याउपरी तर्ही याच्या गावास येकजरा उपसर्ग न देणे बोभाट आलीयावर जोर ताकीद होईल जाणिजे निर्देश समक्ष