लेखांक १८७
श्री १६२४ ज्येष्ट शुध्द १२
श्री सदानंद
राजश्री सरदार पागा व सिलेदार व कारकून लष्कर गोसावी यास
अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य स्नो। जयसिंग जाधवराउ सेनापती दंडवत सु॥ सलासमया अलफ मौजे इडमेडे सा। हवेली वाई हा गाऊ स्वामीकडे इनामगाऊ साल दरसाल चालत आहे तरी तुह्मी कोण्ही या गावास तोसीस न देणें बोभाट सर्वथी कोण्हेविसी येऊ न देणे जो कोण्ही गावास अजार देईल ह्मणजे आह्मास बोल नाही ऐसे समजोन गावाचे वाटे नव जाणे छ १० मोहरम हे विनंती.