लेखांक १८६
श्री १६२३ मार्गशीर्ष वद्य ७
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २८ वृषनाम संवत्सर मार्गशीर्ष बहुल सप्तमी गुरुवासरे क्षतत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी सुभेदार व कारकून सुभे लष्कर पागा व शिलेदार व किलेहाय व बाजे यासि आज्ञा केली ऐसी जे श्री सदानंद याचे मठास अनछत्राकारणे भवानगिरी गोसावी यास मौजे इडमिडे व निंब पैकी जमीन केलासवासी स्वामीनी इनाम दिल्हा आहे तेणेप्रमाणे स्वामी चालवीत असता तुह्मी उपद्रव देता ह्मणून विदित जाले तरी गोसावी याचे इनामतीस उपसर्ग द्यावा हे कोण रबेश याउपरी गोसावी याचे इनामास येकजरा तोसीस न देणे बोभाट आलीया मुलाहिजा होणार नाही हे जाणून लिहिलेप्रमाणे वर्तणुक करणे जाणिजे निदेश समक्ष
रुजु
सुरु सुद