लेखांक १८४
श्री १६२३ मार्गशीर्ष वद्य
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २८ वृष नाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल सप्तमी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिव छत्रपती याणी राजश्री देशाधिकारी व कारकून प्रात वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मोजे इडमिडे व निंब पैकी जमीन श्री सदानंद याचे मठास अन्नछत्राकारणे भवानगिरी गोसावी यासी इनाम दिल्हा आहे ऐसे असता तुह्मी वेटबेगारीचा व हरएक विशीचा उपसर्ग देता ह्मणून विदित जाले तरी कैलासवासी स्वामीने गोसावी सत्पुरुष याकरिता इनाम देऊन चालविला असता तुह्मास उपसर्ग द्यावया गरजा काय हे रीत स्वामीस मनात नाही याउपरी पहिलेपासून गोसावी यास इनाम चालत आलीयाप्रमाणे पुढेही बिलाकुसूर उपद्रव द्याल की कथळा कराल ह्मणिजे मुलाहिजा होणार नाही जाणिजे निदेशसमक्ष