लेखांक १८३
श्री १६२३ मार्गशीर्ष वद्य ७
श्री शिवभक्तीपरायण तपोनिधी भवानगिरी गोसावी वा। निंब यास प्रती राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मी पत्र पाठविले ते पावले लिहिले वर्तमान कळो आले आपणावरी कैलासवासी राजश्री स्वामीने दया करून चालविले अन्नछत्राकारणे इनाम दिल्हा त्यास हाली महालचे कारकून व लष्करचे लोक उपसर्ग देताती तरी निरोपद्रव इनाम चाले ऐसे केले पाहिजे ह्मणून लिहिले ऐसीयास तुह्मी ह्मणिजे सत्पुरुष तुमचे सर्व प्रकारे चालवावे हे उचित त्यास स्वामीसही तुमचे चालवणे अवश्यक आहे कैलासवासी स्वमीने तुमचे चालविले तैसे स्वामीही चालवितील प्रस्तु(त) तुमच्या इनामास उपसर्ग न द्यावा ह्मणून ताकीदपत्रे पाठविली आहेती ते देणे याउपरी कोण्ही तोसीस देणार नाही तुह्मी इनाम अनभऊन स्वामीचे व स्वामीच्या राज्याचे कल्याण चितून सुखरुप असणे छ २१ माहे रजब जाणिजे बहुत काय लिहिणे