लेखांक १७४
श्री १६२१ वैशाख शुध्द ६
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २५ प्रमाथीनाम संवत्सरे वैशाख शुध शष्ठी भोमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणी राजश्री अनाजी जनार्दन देशाधिकारी प्रा। वाई यासि आज्ञा केली ऐसे जे सदानद गोसावी याचे शिष्य आनंदगिरी गोसावी यास मौजे इडमिडे प्रा। मजकूर हा गाऊ यास इनाम आहे तेथील तुह्मी शंभर रुपयेपावेतों वसूल घेतला पुढेही उपद्रव देता राहत नाही ह्मणोन कळो आले तरी मौजे मा।र गोसावी यास इनाम दिल्हा असता तुह्मा वसूल घ्यावया व उपद्रव द्यावया काय गरज आहे याउपरी तर्ही ऐसी गोष्टी न करणे इतकीयाउपरी तुह्मी त्या गावास वसुलाविषी व हरएकविषी तगादा लाविता ऐसा हुजूर बोभाट आलीया तुमचा मुलाहिजा होणार नाही जाणिजे निदेश समक्ष
रुजू सुरनिवीस
सुरु सुद