लेखांक १७३
श्री १६२१ वैशाख शुध्द ६
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २५ प्रमाथीनाम संवत्सरे वैशाख शुध शष्ठी भोमवासरे क्षत्रिय कुलावतस श्री राजाराम छत्रपती याणी समस्त- राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य हुकमतपन्हा यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे प्रा। वाई हा गाव सदाशिव गोसावी याचे सिष आनदगिरी यास इनाम आहे तेथे तुह्मी धामधुम करून से दोनसे रुपयेपावेतो उसूल घेतला पुन्हा आणखी उपद्रव देतच आहा ह्मणौन हे वर्तमान विदित जाले तरी गोसावीयाच्या इनामगावास उपद्रव द्यावा हे कोण गोष्ट आहे याउपरि तर्ही गोसावीयाच्या गावास एक जरा उपद्रव ने दणे महालच्या कारकुनास ताकीद करून हाल खुर्द वर्तवणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
बार