लेखांक १७०
श्री सदानंद कृष्णातीर १६२० भाद्रपद वद्य १०
श्री सकलगुणपरिपूर्ण इश्वरी आधिष्ठान श्री भुवानगिरी गोसावी स्थल श्री आदिमुहुर्ती मौजे निंब प्रा। वाई स्वामीचे सेवेसी
विनंति शिष्यवर्ग बावाजी बिन सुर्याजी देसाई ता। कुडाळ सु॥ मया अलफ शके १६२० प्रमादिनाम संवछरे भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी गुरुवारे ते दिनी वतन गुरुदक्षणापत्र सेवेसी लेहून दिल्हे की आपली वासनी अतर निष्टे नेकी सेवा करावी त्यास आपले शक्ती सेवा करितो परतु नैवेद्य पाहिजे त्यास आपले मनापासून गुरुदक्षणेस आपण आपले इनाम मौजे आखोड ता। कल आहे त्यापैकी जमीन बिघे १० दाहा बिघे साहाटकाचे चावर पैकी स्वामीस दहा बिघे दिल्हे पाटस्थल आहे त्यास सुखरूप शिष्यपरपरेने कीर्दी करून खाणे आपण तुह्मास गुरुदक्षणेस दिल्हे आहे त्यास कोणी हिकहरकती करणार नाही आपले वौशीचे कोन्ही इष्केल करील त्यास श्रीगुरुचे पायाची आण जाणिजे हे विनती छ २२ माहे रबिलावल
गोही
तुलाजी मोर्ये पा। बनोजी तैगल मौजे चिखली प्रा। कर्हाड
प्रभावली सा। निंब पा। वाई रायाजी पा। भिमाजी भा-
सावत स्कर कुलकर्णी
(निशाणी नांगर)