लेखांक १६९
श्री १६२० भाद्रपद शुध्द १५
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २५ बहुधान्य सवत्सरे भाद्रपद शुध पौर्णिमा भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपती याणी कारकुनानी व लोकानी सुभे लष्कर व किलेहाय यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे सा। निंब प्रा। मा।र हा गाऊ सदानद गोसावी यास इनाम आहे तेथे तुह्मी येता जाता धामधुम करिता रयतेस उपसर्ग देता ह्मणोन कळो आले तरी गोसावी यास इनाम गाव दिल्हा असता तेथे तुह्मास उपद्रव द्यावया काय यगरज आहे याउपर तरी त्या गावाचे वाटे नव जाणे घासदाणीयाविसी व हरएक विसी उपसर्ग न देणे ताकीद असे लेखनालकार
सुरुनिवीस
सुद