लेखांक १६३
श्री १६१८ आश्विन वद्य १
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य ताहा मोकदमानी मौजे इडमिडे सा। निब सुहूर सन सबा तिसैन अलफ मौजे मजकूर हा गाव श्री सदानंद समाधिस्थल कसबा निंब याचे पूजा नैवेद्य उत्सावानिमित्य पेशजी इनाम दिल्हा आहे त्याप्रमाणे करार आहे त्याचे शिष्य भवानीगिरी गोसावी आहत त्याचे रजा तलब वर्तोन मौजे मजकूरची कीर्द मामुरी करून उसूल त्याकडे देणे दुसरीयाकडे न देणे कोणेविशी चिंता न करणे रहदारी सरदारास ताकीद दिल्ही असे तुह्मी खुशबाल असत जाणे छ १४ रबिलोवल निदेश समक्ष
बार सुरू सुद बार