लेखांक १६१
श्री १६१८ श्रावण शुध्द १४
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २३ धात्रुनाम संवत्सरे श्रावण शुध चतुर्दशी रविवासरे क्षत्रिय कुलावतस श्रीराजाराम छत्रपती याणी समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री शंकराजी पंडित सचीव मदारुलमाहाम यासि आज्ञा केली ऐसी जे सदानद समाधिस्थल कसबा निंब याचे पूजा नै(वे)द्य उत्सवानिमित्य स्वामीने मौजे इडमिडे सा। निंब पा। वाई हा गाऊ पेशजी इनाम दिल्हा आहे तो तुह्मी त्याचे शिष्य भवानगिरी गोसावी याचे स्वाधीन केला तेथे त्याणी कीर्द मामुरी केली ऐसे असता राजश्री परशराम त्र्यबक याणी त्या गावास उपद्रव देऊन तेथील गुरे नेली ह्मणून विदित जाले त्यावरून तुह्मास हे पत्र लिहिले आहे व त्यासही आज्ञापत्र पाठविले तरी तुह्मी येविशीं रा। परशरामपतास सागणे व त्याकडील लस्करच्या लोकांस ताकीद करून त्या गावास उपसर्ग नव्हे इनाम सुरक्षित चाले आणि त्या समाधिस्थली पूजानैवेद्य उत्सव साग चाले ऐसे करणे जाणिजे बहुत काय लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा
बार