लेखांक १६०
श्री १६१७ अधिक आषाढ शुध्द १४
छत्रपती
अज सरसुभा राजमान्य राजश्री मुरारजी घोरपडे वजारतमाब ता। मोकदमानी मौजे इडिमडे समत हवेली सुभा वाई सु॥ सीत तिसैन अलफ राजश्री आनदगिरीबावा गोसावी यासि राजश्री छत्रपती स्वामीनी अनछत्राकारणे गाऊ दिला आहे ऐसेयासि तुह्मावर सरदेशमुखीचे कारकून तुह्मावर रोखा करितात नसता अजार नेता ह्मणउनु वर्तमान कळो आले तर त्यास सरदेशमुखीच्या कारकुनास मना रोखा लिहिला आहे तुह्मी एक रुका न देणे जो वसूल देणे तो गोसावीबावाकडे देणे रोखा केला तर हाच कागद त्यास दाखवणे एक रुका न देणे जाणिजे छ १२ जिलकाद