लेखांक १५९
१६१३ ज्येष्ठ शुध्द १०
सदानंद
राजश्री आनंदगिरी गोसावी महंत मठ
(शिक्का) समापत्रे मोकाम मठ श्रीगुरु राजश्री
या विदमाने लेहून दिल्हे समापत्रे
तुलाजी पा। सबजी तुकोजी पा। बहिरोजी नागोजी
(निशाणी नांगर) (निशाणी नांगर) (निशाणी नांगर)
या विदमाने लेहून दिल्हे मौजे नींब पा। वाई सु॥ इसने तिसैन अलफ कारणे लेहून दिल्हे कागद ऐसा जे तुह्मी मौजे कुडालीचे पटलगीस जावयास एक जण जाईल त्या जे पैका पडल ते तीघानी द्यावा आपण वाटारियाबराबरी जावे जे कोण भाऊ जाईल त्यास तीघानी जो काय खरचेस लागेल ते द्यावे जो काय तेथे पडिला ते तकसीमप्रमाणे ती ठाई देणे बरोवाइटास आहे त्यास पाठी राखावी हे लिहिले समापत्रे सही हेबदल वडिलाचे इमान असेती श्रीकृष्णाची आण असे हे विनंति
तेरीख ८
रमजान