लेखांक १५८
श्री १६१२ ज्येष्ठ वद्य ३०
राजश्री येसाजी मल्हार देशाधिकारी व देशलेखक
प्रांत वाई गोसावी यासि
॥ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र नीलकंठ नमस्कार सु॥ इहिदे तिसैन अलफ श्री सदानंद गोसावी याचा मठ का। निंब प्रात मजकूर ए जागा आहे ते स्थली आनंदगिरी गोसावी राहत आहेत याचे शिष्य भोवनगिरी हुजूर आले याणी विदित केले की अदलशाहाचे कारकीर्दीस इनाम मठास चावर २ दोनी चालत होता त्याउपरी हिगलागिरी व जोगिंद्रगिरी हे दोघे गुरुबधु मठी होते त्यामध्ये कथळा लागोन यदलशाहाचे कारकीर्दीस दिवाणात भाडत गेले तेव्हा त्याणीं एक चावर इनाम हिंगलागिरी भांडतो यानिमित्य दूर केला आणि एक चावर इनाम का। मजकुरी करार केला होता तेणेप्रमाणे राजश्री कैलासवासी छत्रपतीचे वेळेस चालिला अलीकडे हा कालवरी चालतो ऐसीयासि गोसावी याचा मठ थोर आहे ते स्थली तडीतापडी वरकड अतीत अभ्यागत येताती त्यास अन्न द्यावे लागते त्यास एक चावर इनाम आहे त्याणे पुरवल्यास येत नाही तरी पहिले दोनी चावर इनाम चालत होते तैसेच चालविले पाहिजे सदानद गोसावी बहुत थोर होते त्याचे इनाम चालविलीयाने या राज्याची अभिवृध्दी होईल ह्मणोन कितेक तपसील विदित केले त्यावरून हे पत्र तुह्मास सादर केले असे तरी अदलशाहाचे कारकीर्दीस दोनी चावर इनाम चालत होता की नाही हे दस्तामली रुजू पाहणे देशमुख देश-कुलकर्णी वतनदार आहेत त्याजवेळी मनास आणणे जरी पहिले दोनी चावर इनाम चालत असतील ऐसे असिले हे खरे असेल आणि हिगलागिरी याचे कथलीयाकरिता येदीलशाहाचे कारकीर्दीस एक चावर दूर जाला त्यास हिगलागिरीचे निसबतीचा कोण्ही कथला करणार नसेल ऐसे पुर्ते मनास आणून जरी त्याचे कोण्ही नसली तरी पहिले दोनी चावर चालत होते हे खरे असिले तरी दोनी चावर हालीही इनाम चालवणे ये गोष्टीची बरी चौकसी करून दस्तामली वतनदाराजवेळी दोनी चावर चालवणे ताजा सनदेचा उजूर न करणे छ २८ रमजान पा। हुजूर
बार सुरुसुद बार