लेखांक १४२
श्री १६०० कार्तिक वद्य १४
मशहुरल हर्जरती राजमान्य राजश्री अनाजीपंत सचीव यासी प्रती राजश्री संभाजी राजे दंडवत उपरी रा। सदानंद गोसावी यास निंबमधे इनाम होता तो साप्रत मना केला आहे त्यावरून गोसावी यानी आह्मास सागोन पाठविले की आमचा इनाम जैसा चालत होता तैसा चालता केला पाहिजे ऐसीयास हा मामला काही आह्मास दखल नाही याकरिता तुह्मास लिहिले असे तुह्मास कळेल ते यांचे पारपत्य केले पाहिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा छ २७ रमाजान सु॥ तिसा सबैन अलफ सही*