लेखांक ८०
१५६१ वैशाख शुध्द १३
(शिक्का) (फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे गोवे पा। मजकूर सु॥ तिसा सलासीन अलफ हिगुलगिरी गोसावीयानी मालूम केले जे आपला कालवे फोडले असे ह्मणौऊन तरी हे कायमाना असे कालवा फोडाविया त्याच काय अबजा आहे सालाबादप्रमाणे चालिले असेल तैसे च चालिवीजे उजूर असे तरी हुजूर येइजे तलब आहे खातिरेसी आणौनु सरजाम होईल मोर्तब सूद (शिक्का)
तेरीख ११ माहे मोहरम
मोहरम