लेखांक ७८
१५५९ फाल्गुन वद्य ६
(शिक्का) रुजु निगावान
अज दिवाण ठाणे कर्याती बालाघाट किले पनाला ता। मोकदमानी मौजे आबोडे कर्यात मा। बिदानद सु॥ समान सलासीन अलफ खुर्दखत रा। छ ५ साबान पा। छ १९ सौवाल सादर जाले तेथे रजा जे मधुगीर गोसावी सो। आबोडे कर्याती मा। हुजूर मालूम केले जे आपणास इनाम बिघे ४॥ ता। ठिकणाती बिघे
६३ बाग बिघे
१॥ दर सवाद मौजे मा। कारकीर्दी धाउजी नाईकवाडी किले तातवडा साल वीस चालिले त्याचे भोगवटियाचे कागद गलबल्यात गेले त्यावरी मौजे मजकूर प्राणजी साठेयास मुकासा जाला तेही भोगवद्यटे खुर्दखत दीधले तेणेप्रमाणे भोगवटा व तसुरुफाती चालिली आहे हाली साहेबी पेसजी कारकीर्दी धाउजी व साठे याचे भोगवटेयाचे कागद मानीत नाहीत तरी आपण फकीर आपली इनामती बहुत साल चालिली आहे तरी साहेबी नजर एनायत फर्माउनु अजरामर्हामती करुनु खुर्दखत दीधलिया साहेबास द्वा देउनु खुर्दखत देवावया रजा होय मालूम जालेती मधुगीर गोसावी सेकीन आबोडे यास इनाम बिघे
४॥ साडे च्यारी सदरहू प्रमाणे दर सवाद मौजे आबोडे कर्याती मा। अजमर्हामती दीधले असे ऐसजी कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे दुमाले कीजे तालीक घेउनु असेली इनामदारास फिराउनु दीजे ह्मणौनु रजा रजेहुकूम अमल करणे मोर्तब
(शिक्का)
तेरीख १९ माहे सौवाल