लेखांक ७७
१५५९ पौष शुध्द ७
(शिक्का)
अज रखतखाने राजश्री कृष्णाजी राजे दामदौलतहू कारकुनानि हाळ व इस्तकबाह कर्याती बालाघाट बिदीनद सु॥ समान सलासीन अलफ मधुकीर गोसावी साकिन अबोडे का। मा। हुजूर मालूम केले जे आपणास इनाम बिघे ४॥ साडेचारी
ठिकणाती बिघे ३ बाग बिघा
१॥
दर सवाद मौजे मा। कारकीर्दी धाउजी नाईकवाडी किले तातवडा साळे वीस चाळिले त्याचा भोगवट्याचा कागद गळबलेयात गेला त्यावरी मौजे मजकूर प्राणजी साठेयास मुकासा जाला ते हि भोगवटे खु॥ दीधले तेणेप्रमाणे भोगवटा व तसरुफाती चाळिळी आहे हाली साहेब पेसजी कारकीर्द धाउजी व साठे याचे भोगवटेयाचे कागद मानीत नाहीत तरी आपण फिकमीर आपला इनामती बहुत साले चालिली आहे तरी साहेबी नजर एनायत फर्माउनु अजरामर्हामती करून खुर्दखत दीधलिया साहेबासी द्वा देउनु खुर्दखत देवावया रजा होय मालूम जाले तरी मधुकीर गोसावी सो। आबोडे यासि इनाम बिघे ४॥ साडेच्यारी सदरहूप्रमाणे दर सवाद मौजे आबोडे कर्याती मा। अजरामर्हामती दीधले असे पेसजी कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे दुमाले कीजे तालीक घेउनु असली इनामदारास फिराउनु दीजे मोर्तबू सूद (शिक्का) रुजू सुरुनिवीस
तेरीख ५ माहे साबान