लेखांक ७५
१५५८
(शिक्का)
अज रखतखाने राजश्री खेलोजीराजे दामदौलतहू बजानेब कारकुनान व देसमुखान पा। सोपे व बारामती बिदानद सु॥ सबा सलासैन व अलफ कलमनयनगिरी ९ हिगलगिरी गुसावी हुजूरु मालूम केले जे आपणासि इनाम मौजे मुजेवाडी पा। मजकूर बा। खु॥ सालगु॥ आहे साल मजकुरी माहालीचे कारकुने ताजे खुर्दखताचा उजू---- करिताती दरीबाब खु॥ होय मालूम जाले तरी कमलनयनगिरी हिगुलागिरी गुसावियासि इनाम मौजे मुजेवाडी पा। मजकूर बा। खु॥ रा। मोअजम ता। सालगुदस्ता जैसे दुमाले असेली ते बरनिसबती साल मजकुरी दुमाला कीजे तुह्मी तालीक घेऊन असेली खु॥ इनामदारापासी परतोन दीजे पा। हुजूर रसानीद व मालूम केले जे आपले हकापैकी सालगु॥ नखत बा। गला व आबराईचे नखत बाकी राहिले आहे ते कारकून देत नाही व आपले हुकापैकी ठाणामधे उचापती केली आहे आपणासी इनाम असोन माहाली कारकून इस्कील करून उचापती करिता सकोवतीचा माल आहे दरीबाब सरजाम होय मालूम जाले तरी गोसावियास इनाम कुलबाब कुलकानू बादे हाल जाने हाल देखील आबराई व दुमाहीपटी व तरकरी व जमीये लवाजिमाती कुलबाब दिले असोनु सकोवतीचा माल तुह्मी नेणे हे काय माना आहे आता जे काय तुह्मी नेले असेल ते व गावी बाकी असेल ते कुलबाब दुमाला कीजे याचे गावास ठाणाहून एकजरा तसवीस दिलीया खैरत नाही पेस्तर तकरार फिर्यादी आलिया तुह्मी जाणा तुह्मी गोसावियाचे पैके देऊन व आणीक होन 6 व खुर्दा टके १८ इतके ठाणा नेले व आबराईचे हद ऐसे जाणिजे ह्मणौन गोसावी मालूम केले तरी सदरहू पैके तुह्मी नेले असतील ते सिताब फिराऊन दीजे पेस्तर ऐसे अमल केलिया खैरत नाही
(शिक्का)