लेखांक ७४
१५५८ माघ शुध्द ११
(शिक्का)
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमान मौजे गोवे पा। मा। सु॥ सबा सलासैन अलफ कमलनयनाचे बागातील झाडे तोडुनु लाकुडे तुह्मी नेली ह्मणौन मालूम जाले तरी त्याचे काय लाकडे नेली असतील ती नीबमधे सदानदाचे मठी आणून देणे फरार जाहालेया पेस्तर तुह्मास सगीन जाईल दरीबाब ताकीद आहे
(शिक्का)
तेरीख ९ रमजान