लेखांक ७३
१५५८ पौष वद्य ८
(शिक्का) (फारसी मजकूर) (शिक्का)
अज दिवाण किले सातारा वा देह सदर ता। हुदेदारानि वा मोकदमानि मौजे देगाउ किले मजकूरु सु॥सन सबा सलासीन अलफ कमलनयन गोसावी मोकाम मौजे नीब पा। वाई मालूम केले जे राजश्री सोमाजी दिनकरराऊ काकडा मोकाम मौजे मजूकर आपणासी इनाम बिघे १० दाहा देखील माहासूल व नकदयात वा बाजे उजुहात वा वेठ बेगारी फर्मायती देखील ठाणापटी कुलबाब कुलकानू खुर्दखत होउनु सदरहू जमीन देविले असे ठाणेचे मिसेली सादीर होणे ह्मणौऊन तरी सदरहू इनाम जमीन बिघे १० दाहा बरहुकूम खुर्दखत मोकासाई मौजे मजकूरु दुबाला केले असे कमलनयन गोसावीयाचे दुबाला कीजे ताकीदी असे मोर्तब तालीक लिहून घेऊन असल मिसाल परतून दीजे तेरीख २१ माहे शाबान सन सीत अर्बईन अलफ
(शिक्का)