लेखांक ७२
श्रीसदानंद १५५८ आषाढ शुध्द ७
अज रखतखने मा। हा। राजश्री सोमाजी दिनकरराउ राजे काकडे दामदौलतहू बजानब कारकुनानि व मोकदमानि मौजे देगाउ किले सातारा सू।सन सबा सलासीन अलफ मौजे मजकुरी बो। कमलनयन गोसावी मोकाम मौजे नीब पा। वाई यासि इनाम अवल बिघे
१० दाहा देाा माहासूल वाजे नखतयाती वा बाजे उजुहाती व बेठ बेगारी फर्मायसी देखील ठाणेपद्यटी कुलबाब कुलकानू दिल्हे असे दुमाले कीजे अवलादी व अफलादी दिल्हे असे मर्हाटा होऊन मोडील त्यासी गाईचे आण असे मुसलमान होऊनु मोडील त्या सोराचे आण असे तालीक घेउनु असल परतोनु दीजे मोर्तबु सूदु हद महदूद घालून दीजे
(सिक्का)
ताजाकलम एक आबा इरसाल दिल्हे असे दुमाले कीजे उजूर न कीजे
(शिक्का)
तेरीख ५ माहे सफर
पौ। छ ९ माहे सफर