लेखांक ७१
१५५७ अधिक भाद्रपद वद्य २
अज रखतखाने मसुरुल हजरत राजश्री जगदेराऊ मुधोजी नाईक तुलीदयामदौलतहू वजानेब कारकुनानि वा मोकदमान मोजे निगुडी किले सातारे सु॥ सीत सलासीन अलफ दरवज बदल इनाम बो। कलमनयन मानभाव सेकीन नीब पा। वाई बदल धर्मादाऊ अजरामर्हामत बिघे १५ देखील मळा बिघा
१ नजीक समाध आनंदगिरी देखील नखतयात वा माहासूल कलबाब कुल मक्षिमल कानू ता। देहाय वा तालुक ठाणे दीला असे दुमाला कीजे अवलयाद अफलाद चालवीजे दर हर साल खुर्दखताच उजूर न कीजे हद महमद घालूनु देणे मुसलमान होऊनु इस्कल करील त्यास सौगंद असे वा सौवरची सौगद आसे वा हिंदू होउनु इस्केल करील त्यास गाईब्राह्मणहत्येचे पाप आसे तालीक घेउनु असल इनामदार मजकुरास परतऊ दीजे बदल + + + + + + + + + दिल्हा असे
तेरीख १५ माहे रबिळोवल
+ + सलासीन अलफ