लेखांक ६७
१५५४ भाद्रपद वद्य ९
(फारसी मजकूर)
अज रख्तखाने खुदायवद खान अलीशान खान अजम रणदुल फरादखान खुलीदयामदौळतहू बजानीब कारकुनानि हाळ व इस्तकबाळ व देसमुखानि पा। वाई बिदानद सु। सलास सलासैन अलफ बदळ इनाम कमळनयन गोसावी मुकाम सदानदाचा मठ मौजे नीब पा। मजकूर जमीन चावर १६ कीर्दी जमीन दर सवाद मौजेनीब अवळ जमीन सेत बा। पवाळे जमीन अजरामर्हामती केळे असे देखीळ नख्त व खरीदी गला व तूप व बाजू ऐनजिनस व वेठी बिगारी व बिलेकटी व मोहीमखर्च व ईदसुभराती व हेजीब मु॥ व पेस्तरपटीया व बाजे बाब देखीळ कुळबाब कुळकानूसी जमीन चावर एक दीधला असे साळ दरसाळ सदानदाचे मठास चालवीत जाइजे दर हर साळ ताज खुर्दखताचा उजूर न कीजे ताळिक लेहोनु घेउनु असेली खुर्दखत कमळनयन याजनदीक परतोनु दीजे पा। हुजूर कारकून मोर्तब
तेरीख २२ माहे सफर रुजु शुरुनिवीस
मु॥ क॥ वाई