लेखांक ६६
१५३७ कार्तिक वद्य ७
(शिक्का) तालिक
अज दिवाण ठाणे प्रा। कराड ता। हुदेदारानी व मोकदमानी मौजे उडतरे प्रा। मजकूर बिदानंद सु॥ सीत अशर अलफ प्रो। खुर्दखत रवाना छ २५ रमजान पौ। छ २८ सवाल तेथे रजा जे कमळनयन गोसावी यासी इनाम जमीन अवल चावर पाईण .।. दर सवाद मोजे मजकूर देविले असे देखील महसूल नख्तयाती बाजेपटीया व गला व तूप व वेठबिगार फरमासी देविले असे दुमाले करणे दर हरसाल खुर्दखताचा उजूर न करणे तालिक लिहून घेऊन असल खुर्दखत फिराऊन देणे गजशरायणी प्रा। दिल्हा खुर्द घालून देणे देखील कुलबाबवा देणे हिंदू होऊन मोडील त्यास गोहत्या व मुसलमान होऊन मोडील त्यास सोराची सौगद असे सदरहू प्रो। चालवणे ह्मणोन रजा जे बरहुकूम सदरहू प्रो। दुमाल केले असे दुमाल कीजे असल मिसली इनामदार मजकुरापासीं फिराऊन देणे मोर्तबसुद तेरीख छ २० सौवाल