लेखांक ६५
१५३६ आश्विन वद्य १२
सदर दिन मठ सदानंद मुकाम मौजे निंब पा। वाई अजरख्तखाने मसुरल हजरत खंडेस्वरी सदायसवंत महामेरु राजामानरु राजश्री हिरोजी राजे मोहिते साहेबु दामदौलतहू बजानेब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देशमुखानी मौजे इडमिडे पा। कर्हाड सु॥ सन सीत अशर अलफ कमलनयन गोसावी इनाम जमीन अवल चावर .।. दरसवद मौजे मजकूर देविले असे देखील महसूल नख्तयाती व बाजेपटीया देखील कुलबाब व गला व तूप व वेठेबेगारी व फर्मासी देखील पेस्तरपटीयचा कुलबाब कुलकानू देविले असे दुमाले करणे दरहर साल खुर्दखताचा उजूर न करणे तालिक लेहोन घेऊनु असल खुर्दखत इनामदार मजकुरापाशी फिराउनु देणे गजशरायणीप्रमाणे हमदहदूद घालुनू देणे परवानगी हुजुरु हिंदु होऊनु मोडील त्यासी गोहत्या मुसलमान होऊनु मोडील त्यासी सोराचे सवगद असे सदरहूप्रमाणे चालवणे सालाबाद चालवणे करकीर्दी दर कारकार्दी फकिराणा चालिला असे सदरहूप्रमाणे चालवणे मोर्तबु
तेरीख २५ माहे रमजानु